''स्वातंत्र्यवीर सावरकर ''
अंतरात्म्यातील प्रत्येक श्वास आणी श्वास , शरीरातील धामन्यांतून वाहणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबांमधून , मनातल्या अंधःकाराला ज्योतीचा प्रकाश दाखवून केलेल्या पराकाष्ठेला जर विवेकाची जोड़ मिळाली तर के उणे ? कारण प्रत्येक कृती , मनातील प्रत्येक विचार जार ह्या राष्ट्रमातेला समर्पित केला नहीं तर ते सावरकर नव्हे तर दूसरे कोण ?
स्वर्गरोहणानंतरही चाचपडून पाहणारे स्पर्श , मनाला रुखरुख लवणारे डोळे व हृदयातून येणारा प्रत्येक आवाज हा भारतमातेच्या कल्याणासाठीच आहे ना हे तपासून पाहणार व्यक्तिमत्व म्हणजे सावरकरच होय.
आपण जाणतो , शरीराला आमच्या आत्म्याची जोड असते तेव्हा जीवन तयार होत;पण सावरकर म्हणतात "नश्वर शरीराला आत्म्याची नव्हे तर अंतरात्म्याची जोड हवी असते ".
सावरकरांच्या कार्य ,काव्य ,विचार व कृती यांचा विचार केला तर सातासमुद्रापलीकडचेच काय , ह्या क्षितिजालाही थांग उरणार नाही, महापुरुष जाणतात -
"आपलं आयुष्य हे कधीच आपल नसत "
"ते आपल्याइतकच इतरांच असत.. "
सावरकरांना व्यक्ती म्हणाव तरी कस ? ते तर ईश्वराचा पृथ्वीवरील दैदीप्यमान अंशच !!स्वाभिमान तर अभिमानाने केव्हाच मखरात बसवलेला! सावरकरांच आयुष्य असच होत -
"आयुष्य उर्वशीची कर्पूरगौर काया,
घननीळ मैथुनाचा ,आयुष्य कैफ काळा ,
आयुष्य निग्रहाची ,दुर्दम्य अग्निरेखा ,
आयुष्य आग्रहाची ,अलमस्त धर्मशाळा "
"आयुष्य अस्मितेचा ,बेलाग एक किल्ला ,
दुनेयेविरुद्ध जुल्मी , आयुष्य एक हल्ला ,
आयुष्य एक सीधे, आव्हान काळपुरुषा ,
बिनतोड आसवांचा ,आयुष्य हा रिसाला "
"विरास विक्रमांची ,आयुष्य एक संधी ,
आयुष्य शंकराचा ,तीसरा अजेय डोळा ".
विद्याव्यासंगी ,श्रद्धावान , राष्ट्रमातृभक्त आणि हिंदुत्वाचे पुढाकारी असलेल्या सावरकरांना शतशाः प्रणाम.!!!!
No comments:
Post a Comment