Saturday, 16 May 2015

मराठीची संस्कृती  कालची , आजची , आणि उद्याची 

भाषेला संस्कृती असते म्हणजे काय ? भाषा  ही समाज व्यवहाराचे साधन, त्या  व्यवहाराचा अंगभूत  भाग  असल्यामुळे, त्या  त्या भाषिक समाजाच्या  परंपरांचा व संस्कृतिचा अंगीत  ठसा तिच्यावर सतत  उमटत असतो. या दृष्टीने मराठी भाषेची  आजची घटना  व  तिच्यातला शब्दसंग्रह हा मराठी समाजाच्या विशिष्ठ परंपरेचा परिपाक होय असे  म्हणता  येईल. मराठीची  संस्कृति हीच. विशिष्ठ  काळातील परंपरेचा परिणाम व  त्या  काळातील ऐतिहासिक आवश्यकता  यानुसार मराठीच्या घटनेत फरक पडत आला आहे.
 मराठीची बाह्य घटना अशी सिद्ध होत असताना  याच इतिहासातून व परंपरेतुन तिने काही विशिष्ठ प्रेरणाही ग्रहण केल्या आहे. मराठीची बाह्य घटना हे जर  तिचे शरीर , तर ह्या प्रेरणा म्हणजे  तिचा आत्मा होय.
          प्रेरणानां तिचा स्वाभाव , तिची संस्कृती मिळतो .व  मराठीच्या  रूपपरिवर्तनात या प्रेरणांनाही महत्वाचे  स्थान  आहे. 



No comments:

Post a Comment