Saturday, 1 August 2015

                         एकदा देवर्षी नारद ब्रम्हादेवाला विचारतात की देवा आयुष्यात यशाचे मार्ग कोणते ?
तेव्हा ब्रम्हदेव म्हणतात मुनिवर, मुळात  यश हे अमृतकुंभासारखे असते , की जे मिळवण्यासाठी अखंड ,अविरत प्रयत्न करावे लागतात , पण त्या प्रयत्नांनाही जोड हवी असते ती म्हणजे "दिशा ,बुद्धि ,तर्क व अनुमान"यांची। तेव्हा, दिशा ,बुद्धि ,तर्क ,अनुमान हेच यशाचे मार्ग होय। 
पण मुनिवर लक्षात घ्या ,की या यशाच्या मार्गांवर कसे  चलायचे हे मार्गदर्शन करू शकतो तो एकमेव गुरु असतो.
                           
                          द्न्यनाने यशाची प्राप्ती होते  व गुरू म्हणजे अद्न्यानरूपी अंधःकाराचा नयनाट करणारा सूर्याचा तेजस्वी किरण। गुरु म्हंटल्यास अद्न्यानरूपी अंधःकारातून द्न्यनारूपी प्रकाशाकडे नेणारी  वाट.
  व आज ही गुरुंच्या अनंत उपकारांना स्मरण कारणांरी आषाढतील गुरुपौर्णिमा.
                           मित्रांनो, गुरु म्हणजे केवळ द्न्यनाच नाही तर गुरु म्हणजे श्रद्धा , विश्वास,दृष्टी व जगण्याचा आधार. गुरुचरणी वनदन करायास -
                                                "अखंड मंडलाकारम् व्याप्तं येन चराचरम् ,
                                                    तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवै नमः "
या जगात तत्व एवढे आहेत की जगाता जगाता आयुष्य निघून जाईल, पण त्या सबंध तत्वाच मूळ जिथे स्थिरावल आहे , त्या मुळ!चा शोध  घेण्यास मदतीचा हात देणारा तो एकमेव गुरु असतो।
                            मित्रांनो कृपया लक्षात घ्यावे , शिक्षक व गुरु यांतील फरक हा असा की शिक्षकाचे "अध्यापन" हे कर्म म्हणून व  "अर्थार्जन "हे व्यवसाय म्हणून असे दोनच विचार असू शकतात पण गुरुंचे मात्र   "अध्यापन ,संस्काराध्यापन ,मार्गदर्शन ,विचारदिशादर्शन  व मूल्यशिक्षण " हेच पंचकर्मा होत। 
                             मी ईश्वराला स्मरुन सांगते की, आजही शिक्षाही गुरु होऊ  शकतो पण जर केवळ कर्म म्हणून अध्यापन व् व्यवसाय म्हणून अर्थार्जन हे जरास  बाजुला ठेवल तर ,व त्या ऐवजी वरील पंचकर्मांना प्रार्थमिक कर्तव्य म्हणून आपलसं केल तर। कारण गुरु हा जीवनाची वाट तयार करणारा अभियांत्रिक असतो.
                              गुरु हा शिष्यासाठी त्याचे "तेज ,तत्व ,मती व शक्ती प्रदाता "असतो-


                               "चिन्मयं व्यापियत्सर्वं त्रयलोक्यं सचराचरम् 
                                     तत्पदं दर्शितं येन तस्मैश्री गुरुवे नमः "
म्हणजेच शिष्यानेही अश्या तेज ,तत्व ,मती शक्ती प्रदात्या गुरूच्या ठिकाणी नम्र व्हावे लागते,व  संसाराच्या कल्याणासाठी ग्रहण केलेल्या द्न्यानाचा उपयोग करून गुरुंचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा लागतो।  तेव्हाच गुरु -शिष्याचे नाते परिपूर्ण होते. 







No comments:

Post a Comment