गेला गेला काळ तो
शब्द शब्दात रूजुनी
फिटले अंधाराचे जाळे
मनी प्रकाश उजळूनी ।।१।।
उगी केला आटापिटा
सांग मना कवनाचा
फिरालेकी दाहीदिशा ,
हाती बांधुनी ठेवियला ,जोगवा तो नमनाचा ।।२।।
शुद्र अश्या जिंदगीचे
कुनी फेडीयाले पांग ,
तुकोबाचे गाने गाता
जिन कसं झालं सांग ।।३।।
कोंडूनी टाकीला श्वास श्वास
आवाज तोही कोन्दियेला
मन मोकळे करायाला
कोनी नाही भेटीयेला ।।४।।
बसयीला मनी जेथ
काया गोमटा इट्टल
माथ्यावरी काया तिलक
मुखी नाम इट्टल ।।५।।
धारीनीच्या मातीमधी
सोन कसं उगिल
घाम गाळून कईल सार
शिवार माज सोन्यासम ।।६।।
उगीयला सोनियाचा दिनू ,
खोपट सार सारवला
चीमान्यांना पानिचारा
पिरेमान भाराविला ।।७।।
उगी मनी वेधला ,
अजुनी काय करायाचे जीने
इट्टलाचे चरनी शहन्याने नीज व्हावे ।।८।।
(कवयित्री बहिणाबाई चौधरींना समर्पित )…….
No comments:
Post a Comment